चाटगावच्या कन्येचे नेत्रदीपक यश
कोणतीही शिकवणी न लावता केवळ स्व अभ्यास करून प्रज्ञा देशमाने हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
बीड जिल्ह्यातील चाटगाव (ता.धारूर) येथील सुकन्या तथा दिंद्रूड येथील सिंधफणा शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा बाबासाहेब देशमाने हिने इयत्ता दहावी परीक्षेत ९० टक्के गुण संपादन करून नेत्रदीपक यश मिळविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रज्ञाने सांगितले, पुढील शिक्षणासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून आरोग्य सेवेत करिअर करण्याचा मानस आहे. दहावीसाठी शिकवणी वर्ग लावला नव्हता. स्व अभ्यास करून ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. याचे श्रेय मी मला सतत प्रेरणा देणारे मुख्याध्यापक गणेश उजगरे, सहशिक्षक काशिनाथ आकुसकर, सहशिक्षिका पुष्पा खोत यांना देते. दरम्यान, प्रज्ञा देशमाने हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रज्ञा ही पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने यांची कन्या आहे.
Comment here