आपला जिल्हा

युवकांनी तलाठी भरतीसाठी सहभागी व्हावे : नुमान चाऊस

माजलगाव : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली तलाठी भरती अखेर सुरू झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्यांसाठी किंवा सरकारी पदावर काम करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या तलाठी भरतीसाठी युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नुमान चाऊस यांनी केले आहे.

सदर पदासाठी एकच परीक्षा (सरळसेवा) १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कॉम्प्युटर बेस (ऑनलाईन) होणार आहे. या परीक्षेचा आवेदन फॉर्म mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भरावयचा आहे. सर्व पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचा आवेदन शुल्क ९०० रूपये आहे. प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ही परीक्षा होणार आहे. तरी जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा व तलाठी भरती परीक्षेचा आवेदन फॉर्म भरावा असे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे. सदर भरती बाबत मार्गदर्शन पाहिजे असल्यास संपर्क ९७६६६२७९८६ किंवा अपना मल्टीसर्विसेस, मेन रोड माजलगाव येथे भेट द्यावी, असेही चाऊस यांनी म्हटले आहे.

Comment here