आपला जिल्हा

रत्नाकर शिंदेंची निवड नवचैतन्य निर्माण करणारी

कट्टर शिवसैनिक बाळासाहेब मेंडके यांचा विश्वास

माजलगाव : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या निवडीमुळे संपूर्ण माजलगाव मतदारसंघात नवचैतन्य संचारले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या निवडीमुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सच्चा शिवसैनिकाला न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया कट्टर शिवसैनिक बाळासाहेब मेंडके यांनी दिली.

पुढे बोलताना बाळासाहेब मेंडके म्हणाले, रत्नाकर शिंदे हे गेली तीन दशके शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन सामान्य घटकांसाठी लढत आहेत. त्यांची निवड म्हणजे सच्चा शिवसैनिकाच्या कामाला दिलेली योग्य पोचपावती आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ राहून तळागाळातील माणसांना विचारात घेणारे नेते म्हणून शिंदे यांची ख्याती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विद्यमान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे विचार प्रामाणिकपणे पुढे नेण्याने काम शिंदे करत आहेत. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करून महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी नवे बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना साथ द्या, असे आवाहनही बाळासाहेब मेंडके यांनी केले आहे.

‘त्या नेत्याच्या बगलबच्च्यांची चिखलफेक खपवून घेतली जाणार नाही’

माजलगाव मतदारसंघातील हाकलपट्टी झालेला नेता पद गेल्यापासून वैफल्यग्रस्त झाला असून त्या नेत्याचे बगलबच्चे कार्यकुशल जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर त्यावर चिखलफेक करत आहेत. ही प्रवृत्ती खपून घेतली जाणार नाही, असा इशाराही बाळासाहेब मेंडके यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची माजलगाव येथे बैठक घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीला माजलगावतील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Comment here