महा-राष्ट्र

मंगेश चिवटे हे सामान्य माणसांसाठी आरोग्यदूत

शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम येवले यांचे प्रतिपादन

माजलगाव : राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आरोग्य सेवेतील योगदानाला तोड नाही. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे सामान्य माणसांसाठी आरोग्यदूत बनून प्रामाणिक काम करत आहेत, असे कौतुक उद्गार माजलगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम येवले यांनी काढले.

महेश हिअरिंग अ‍ॅण्ड स्पीच थेरपी क्लिनिक आणि आरोग्यदूत मासिक आयोजित आरोग्य शिबिरात येवले बोलत होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा आरोग्यदूतचे संपादकीय सल्लागार मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे 15 जून रोजी मोफत श्रवण दोष तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नवजात शिशू ते वृद्धांपर्यंत कानांची तपासणी केली. प्रारंभी शिबिराबाबत आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने यांनी भूमिका मांडली. यावेळी उपस्थित नागरिकांना महेश हिअरिंग अॅण्ड स्पीच थेरपी क्लिनिकचे संचालक महेश बोबडे यांनी मार्गदर्शन केले. हे मोफत श्रवण दोष तपासणी शिबिर समता कॉलनी, डॉक्टर लेन, इंदाणी हॉस्पिटल शेजारी, माजलगाव, जि.बीड येथे घेण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिराचे सूत्रसंचालन आणि आभार आरोग्यदूतचे सहसंपादक भगीरथ तोडकरी यांनी मानले.

Comment here