महा-राष्ट्र

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आरोग्यदूत’चे प्रकाशन

आषाढी एकादशीचे औचित्य; दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखात प्रकाशन

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरोग्यदूतच्या नव्या अंकाचे प्रकाशन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री महोदयांसह सहकारी मंत्री, आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.

या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, आमदार समाधान आवताडे, आमदार मंगेश चव्हाण, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे आदींची उपस्थिती होती. संपूर्णतः आरोग्यविषयाला वाहिलेल्या आरोग्यदूत मासिकाचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी यांना याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या.

Comment here