आपला जिल्हा

राष्ट्रीय सहकार परिषद उद्या नवी दिल्लीत

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे सीईओ रविंद्र कानडे निमंत्रित

नवी दिल्ली : १७ वी राष्ट्रीय सहकार परिषद नवी दिल्ली येथे शनिवार, दि.1 जुलै रोजी होत असून या परिषदेच्या निमित्ताने देशभरामध्ये सहकारामध्ये काम करणारे काही प्रतिनिधींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

या परिषदेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होत असून या परिषदेला देशाचे सहकार मंत्री अमित शहा, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी मल्टीस्टेट चळवळीच्या वतीने मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाचे एक शिष्टमंडळ देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मल्टीस्टेट संदर्भात येत असलेल्या अडीअडचणी व कायद्यातील सुधारणा संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी प्रतिनिधी म्हणून माजलगावातील श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक तथा राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संचालक ॲड.रविंद्र कानडे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देशभरामध्ये सहकाराच्या माध्यमातून मोठे काम करता यावे या उद्देशाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्वतंत्र असे सहकार मंत्रालय केंद्रामध्ये निर्माण झाले असून याची पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांच्यासारखे दिग्गज व्यक्तींकडे याचा कार्यभार देण्यात आलेला आहे. या परिषदेमध्ये मोदी सरकारने सहकार मध्ये केलेले बदल व अपेक्षित बदल यावर विस्तृत चर्चा होणार असून यामुळे देशातील सहकाराला नवीन दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त सहकार महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्रातील प्रतिनिधींचा या परिषदेमध्ये असलेल्या समावेशामुळे देशभरातील सहकार धोरणावर या प्रतिनिधींच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रातील सहकारी नेतृत्वाला देशाचे सहकार धोरण ठरवण्याचा मान मिळत आहे असे ॲड.रविंद्र कानडे यांनी सांगितले.

Comment here