आपला जिल्हा

सद्गुरू श्री मिस्किन स्वामी मठातर्फे शैक्षणिक मदतीचा महाजागर

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांच्या पुढाकारातून ६१ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

माजलगाव : समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. शैक्षणिक मदतीचा हा महाजागर भविष्यातही सुरूच राहील, असे प्रतिपादन सद्गुरु श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी माजलगाव येथे केले.

गुरूपौर्णिमेनिमित्त मठातर्फे समाजातील ६१ विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी ५ हजार रूपये शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी महाराज बोलत होते. गुरूपौर्णिमेनिमित्त प्रसिद्ध सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. समाजातील अबालवृध्द विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे मनोभावे दर्शन करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले, मठातर्फे धार्मिकतेबरोबरच सामाजिक उपक्रमांना अग्रक्रम दिला जाईल. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो. अगदी याच भावनेतून तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी धार्मिक क्षेत्रात केलेले कार्य महान असून त्यांच्या विचारांचा, कृतीचा वारसा आणि वसा प्रामाणिकपणे चालवू अशी ग्वाही समाज बांधवासमोर श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली. या कार्यक्रमाला रामेश्वरआप्पा कानडे, ओंकार खुर्पे, विश्वनाथ शेटे, ओमप्रकाश वाकळे, शिवहर महाजन, नितीन शेटे, अमोल खोत, विकास पाटील, गणेश तोडकरी, राजाभाऊ लोखंडे, ओंकार शेटे, प्रशांत शेटे, महेश आवटे, सुरेश कुरूळे, ओंकार पंचाक्षरी, भालचंद्र पाटील, विजयकुमार पाटील, दत्ता पेटकर, महादेव पेठकर, भीमआप्पा लोखंडे आदींसह गुरूपौर्णिमा उत्सव यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिश्रम घेतले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी समस्त वीरशैव तरूण मित्र मंडळाने चोख व्यावस्था केली. या गुरूपौर्णिमा उत्सवाचे रंगतदार सूत्रसंचालन माधव पेठकर यांनी केले.

‘सद्गुरू श्री मिस्किन स्वामी मठाला धार्मिकदृष्ट्या वैभवशाली परंपरा’

गुरूपौर्णिमा कार्यक्रमात बोलताना श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा रामेश्वरआप्पा कानडे म्हणाले, माजलगावतील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवैक्य तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी या मठाला वैभवशाली शिखरावर नेले. याच विचारांचा महान वारसा पुढे उत्तराधिकारी श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज सक्षमपणे चालवत आहेत. माजलगाव मठाचे धार्मिक अधिष्ठान टिकवून ठेवण्यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कानडे यांनी केले. यावेळी वर्तमान माध्यम समुहाने काढलेल्या गुरूपौर्णिमा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘वर्तमान’चे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी यांनी संपादित केलेल्या गुरूपौर्णिमा विशेषांकाचे श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे चेअरमन रामेश्वर कानडे, महानंदा मल्टीस्टेटचे चेअरमन ओंकार खुर्पे यांनी कौतुक केले.

महाराष्ट्रबाहेरील भाविकांचीही रिघ

गुरूपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी माजलगावच्या श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाकडे भाविकांची रिझ लागली होती. यात महाराष्ट्रा बाहेरील भाविकांचीही लक्षवेधी उपस्थिती होती. माजलगाव, धारूर, गेवराई, महागाव, दिंद्रुड, वडवणी, घाटसावळी, सिरसाळा, बहादरपुरा, पेठशिवणी, मसल मांडेखळे, मंगरूळ, बहादरपुरा, बोरगाव, बीड, बार्शी, बोरी सावरगाव, कानडी बोरगाव, पेठशिवणी, पिंगळी, पाथरी, नायगाव, परळी, परभणी, पुर्णा, नायडोंगरी, नानज, नायेगाव, नांदेड, नित्रुड, चिंचाळा, चाकूर, धोतरी, धनेगाव, धामणगाव सेंद्र, नाळवंडी, केसापुरी, कवडगाव, रामपुरी, कानडी बोरगाव, धनेगाव, नायगावपाडोळी, अंबाजोगाई, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, धुळे, बार्शी, सोलापूर, गुलबर्गा, कोद्री, लातूर, औसा, बसवकल्याण, बेळगाव, धारवाड येथील भाविकभक्त उपस्थित होते.

Comment here