आपला जिल्हा

तुळजाभवानी अर्बनमुळे ‘स्कूल चले हम’ मोहिमेला गती!

पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

माजलगाव : सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. तब्बल पाच हजार पहिलीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप केले आहे. मोठेवाडीसह तुळजाभवानी अर्बनच्या १६ शाखा अंतर्गत १४० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शालेय साहित्य वाटप केले. त्यात स्कूल बॅग, तीन नोटबुक, कंपास आदी साहित्याचा समावेश आहे.

माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे तुळजाभवानी अर्बनच्या वतीने गुरूवारी शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष सुदर्शन हिवरकर, उपाध्यक्ष अशोक मुळे, माजी सरपंच विष्णू खेत्रे, मुख्याध्यापक शिंदे, उपसरपंच अंगद खेत्री, ग्रामपंचायत सदस्य विलास खेत्री, नाथाराव खेत्री, ज्ञानेश्वर खेत्री, जगन्नाथ खेत्री यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शाखाधिकारी निलेश अनभुले यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांनी शालेय साहित्याचे वाटप करण्याचा उद्देश सांगत अभ्यासात सातत्य ठेवा, स्वयंअध्ययनावर भर द्या असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी भगवान पवार, गजानन गोंडे, अनिल हिवरकर, जगदीश खेत्री, शिवाजी पाष्टे, विष्णू गर्गे, दिगंबर सरवदे, सचिन मगर यांच्यासह विद्यार्थी, पालक, गावकऱ्यांची उपस्थिती होती.

दर्जेदार शिक्षण काळाची गरज : चंद्रकांत शेजुळ

आपण सामाजाचे काहीतरी देणेकरी लागतो. या भावनेतून पहिलीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण साहित्य देण्यात आले. यापुढेही शिक्षण क्षेत्रात वेगळे अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला दर्जेदार शिक्षण मिळणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शालेय साहित्याच्या माध्यमातून तुळजाभवानी अर्बन परिवाराने एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी माहिती तुळजाभवानी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.

Comment here