समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी
परळी वैद्यनाथ : शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय पंडितांना मुंडे यांचे सुपूत्र तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांची आज राज्य मंत्रिमंडळाच्या कृषी मंत्रीपदी नियुक्ती झाल्याचा राज्यपाल आदेश जारी होताच परळी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदनियुक्ती बद्दल जल्लोष साजरा केला. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यातील बळीराजा हा नक्कीच सुखावेल तसेच बळीराजाला चांगले दिवस येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, परळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, रविंद्र परदेशी, युवा अभय मुंडे, जयपाल लाहोटी, राजेंद्र सोनी,अनिल आष्टेकर,जयराज देशमुख,अनंत इंगळे,रामेश्वर महाराज कोकाटे,अझीझ कच्छी,रवी मुळे,गोविंद कुकर,गोविंद कराड,सय्यद सिराज,भारत ताटे,नाझेर हुसैन,महेंद्र रोडे,बळीराम नागरगोजे,नितीन आडेपवार,शकील कच्छी,भारत ताटे,रमेश मस्के,राजकुमार डाके,शेख राजू भाईजितेंद्र नव्हाडे,शरद कावरे,मुन्ना ताटे,अमर रोडे,वाजेद खान,अबुझर खान,बाळासाहेब मुंडे,दीपक मुंडे,बापू ताटे,चंद्रप्रकाश हालगे यांसह आदी उपस्थित होते.
Comment here