आपला जिल्हा

सामाजिक भान जपणाऱ्या अॅड.नारायण गोले यांच्या वकिलीला दीड दशक

माजलगाव : कोणतीही नफ्या तोट्याची गणिते न मांडता केवळ सामाजिक भान म्हणून येथील विधिज्ञ अॅड.नारायण गोले पाटील यांनी काम केले आहे. त्यांच्या विधिज्ञ म्हणून करत असलेल्या सेवेला दीड दशक पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरावर कौतुक होत आहे.

दि.१७ जुलै २००७ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी ऍनरॉलमेंट दिले. अन् वकिली सुरू करून सोळा वर्षे पूर्ण झाली. या सोळा वर्षात हजारो प्रकरणे हाताळली त्यातून अनेक उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यात यश आले, वकिली करतांना पैसे कमावण्याचा कधीही विचार केला नाही, गोरगरीब, कष्टकरी लोकांवर होणारा अन्याय याला वाचा फोडण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, न्यायदानाच्या चळवळीचा भाग म्हणून समाजसेवा समजून सेवा अॅड.नारायण गोले पाटील यांनी केली.

Comment here