आपला जिल्हा

मराठा आरक्षणाचा सुर्डीतही एल्गार 

सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरू 

माजलगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी माजलगाव तालुक्यातील सुर्डी नजीक या गावांमधील मराठा समाज मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणला बसला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील चौदा दिवसांपासून उपोषण करत आहेत येथील आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. येथील आंदोलकानवर गोळ्या झाडून लाटीचा मार देखील केलेला आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये आंदोलने केली जात आहेत. माजलगाव तालुक्यामधील सुर्डी नजीक या छोट्याशा गावात मागील पाच दिवसांपासून संपूर्ण आहे. या गावकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपरी, जायकोवाडी, सांगवी, वाघोरा येथील समाज बांधवांनी आंदोलनास्थळी भेट दिली आहे. याप्रसंगी अंकुश गरड, ज्ञानेश्वर गरड, पवन गरड, दीपक गरड, बालाजी गरड गोविंद पाटेकर, पापाजी जाधव, दादासाहेब गरड, दादासाहेब गरड, भिसे सर आदींसह मराठा समाजातील ज्येष्ठ, युवक मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसले आहेत.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील चौदा दिवसांपासून उपोषण करत आहेत येथील आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. येथील आंदोलकांवर गोळ्या झाडून लाटीचा मार देखील केलेला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये आंदोलने केली जात आहेत. माजलगाव तालुक्यामधील सुर्डी नजीक या छोट्याशा गावात मागील पाच दिवसांपासून संपूर्ण आहे. या गावकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपरी, जायकोवाडी, सांगवी, वाघोरा येथील समाज बांधवांनी आंदोलनास्थळी भेट दिली आहे. याप्रसंगी अंकुश गरड, ज्ञानेश्वर गरड, पवन गरड, दीपक गरड, बालाजी गरड गोविंद पाटेकर, पापाजी जाधव, दादासाहेब गरड, दादासाहेब गरड, भिसे सर आदींसह मराठा समाजातील ज्येष्ठ, युवक मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसले आहेत.

Comment here