महा-राष्ट्र

‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड’ने बाजीराव चव्हाण सन्मानित

मुंबई : येथील कोर्ट यार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३ तर्फे युवा उद्योजक तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल, रोशनी कपूर, विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंटचे संचालक प्रसाद महादेव कमलाकर यांच्या हस्ते बाजीराव चव्हाण यांना ‘उत्कृष्ट युवा उद्योजक’ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. गेली अनेक वर्षे बीड जिल्ह्यातील बाजीराव चव्हाण हे उद्योग व्यवसाय तसेच सामाजिक आणि वैद्यकीय सेवेतही काम करत आहेत ही बाब बीड जिल्हावाशियांसाठी आनंदाचीच आहे. अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात ह्यूमन राईट आणि विश्व या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

Comment here