महा-राष्ट्र

पाथरीत आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य नोकरी महोत्सव

शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची माहिती

पाथरी : शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने पाथरी येथे रविवार, दिनांक १० डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव व मोफत जॉब कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे.

परभणी जिल्ह्यातील तरूणांना रोजगार मिळावा व दर्जेदार शिक्षण घेणाऱ्या युवकांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळावी यासाठी अल्पसंख्यांक विभागाचे शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने रविवार, दि.१० डिसेंबर पाथरी येथे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येथे शिवसेनेचा भव्य मेळावाही पार पडणार आहे. या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या नोकरी महोत्सवात जिल्ह्यातील युवकांनी उपस्थिती लावावी व आपली नोकरीची गरज जागेवरच पूर्ण करावी असे आवाहन शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केले आहे. तसेच शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्याला जिल्हाभरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष खान यांनी केले आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य नोकरी महोत्सव व मोफत जॉब कार्ड तसेच आयोजित शिवसेनेच्या मेळावा विषयी प्रदेशाध्यक्ष खान यांनी पाथरी शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. नोकरी महोत्सवात नामांकित १०० विविध कंपन्या सहभागी होणार असल्याचे सांगून पात्र व गरजू उमेदवारांना कंपन्यांकडून जागेवरच नियुक्त पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते देण्याचे नियोजन असल्याची माहिती खान त्यांनी यावेळी दिली. नोकरी महोत्सवासाठी आजपर्यंत जवळपास १९ हजार सुशिक्षित तरुणांनी नोंदणी केली आहे. ठिकाणी वर्षभरात नोकरी उपलब्ध करून देण्याबाबत कंपन्या सहकार्य करणार आहेत. पाथरी तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील तरुणांसाठी ही संधी उपलब्ध असल्याचे सांगत नोंदणी नसलेल्या व वेळेवर उपस्थित झालेल्या तरुणांना देखील या महोत्सवामध्ये सहभागी होता येणार असल्याचे खान यांनी यावेळी सांगितले.

Comment here