महा-राष्ट्र

किल्ले रायगडावर १६ जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

रायगड : छत्रपती शंभूराजांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दि. १६ जानेवारी २०२४ रोजी राजधानी रायगड येथे संपन्न होत असून या सोहळ्यास तमाम शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतिने करण्यात आले आहे.

शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती, रायगड च्या वतिने मागील नऊ वर्षांपासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो. या वर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे, कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते यंदाचा राजाभिषेक संपन्न होणार आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतीविषयी धोरण अवलंबिले दुष्काळी परिस्थितीत रयतेस जो आधार दिला, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठास ही धक्का लागता कामा नये, मुलुखगीरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हाच शिरस्ता छत्रपती संभाजमहाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी त्यात काळानुसार बदल करत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी जे योगदान दिले त्याच शेतकऱ्याच्या पोशिंदा राजाच्या हस्तेच या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.

Comment here