आमदार संजय शिरसाठ यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : तरूणांनी उद्योजक बनून जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केले. ते शुक्रवारी ‘राधाकृष्णा फुड्स & लाईफ स्टाईल स्टोअर्स’च्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
युवा उद्योजक योगेश शिंदे पाटील यांच्या नक्षत्रवाडी येथील राधाकृष्णा फुड्स & लाईफ स्टाईल स्टोअर्स या दुसर्या फर्मचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्यदूत, मुंबईचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी, संतोष नाईकवाडे, शिवसेना युवा नेते सुमित त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी युवा उद्योजक योगेश शिंदे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटक आमदार संजय शिरसाठ पुढे बोलताना म्हणाले, तरूणांनी व्यवसायाकडे वळण्याची गरज असून अल्पावधीत नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर येथील योगेश शिंदे पाटील यांची यशस्वी वाटचाल आणखी पुढे जावी ही सदिच्छा व्यक्त केली.
‘राधाकृष्णा’चे दर्जा आणि गुणवत्तेला प्राधान्य : योगेश पाटील
राधाकृष्ण फुड्स & लाईफ स्टाईल स्टोअर्सचे संचालक योगेश शिंदे पाटील म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता आणि दर्जाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. राधाकृष्ण फर्मच्या माध्यमातून एकाच छताखाली दर्जेदार उत्पादने आणि वस्तू ग्राहकांना कशा मिळतील यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती योगेश पाटील यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक योगेश शिंदे, संचालिका अक्षदा शिंदे, योगिता भिंगारे, विजया मगर, पडवळकर, रोषण मुळे, अनिल पवार, सागर शिंदे, आदिनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले.
Comment here