आपला जिल्हा

तुळजाभवानी अर्बनच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात २ हजार महिलांना दिले पुस्तकांचे वाण

मकर संक्रांतीनिमित्त महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे : सौ.दिपालीताई शेजुळ

माजलगाव : सहकाराबरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. माजलगावच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात सुमारे २ हजार महिलांना वाण म्हणून महापुरुषांची पुस्तके देण्यात आली. या आदर्शवत उपक्रमाची प्रशंसा होत आहे.

‘आपली माणसं, आपला विकास’ हे ब्रीद घेऊन सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने हळदी कुंकू कार्यक्रमात विचारांचे आदर्श वाण देऊन महिलांमध्ये जागृती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा सौ.दिपालीताई चंद्रकांत शेजुळ यांनी प्रास्ताविक केले. हळदी-कुंकू कार्यक्रमात खऱ्या अर्थाने महिलांना प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने महापुरूषांचे विचार देणारे प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. प्रारंभी काकार्यक्रमात माॅ साहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, त्यागमूर्ती माता रमाई, आयर्न लेडी इंदिराजी गांधी, अंतराळवीर कल्पना चावला यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. लेखिका ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरुष तुलना, लेखक अशोक राणा लिखित शाक्तवीर शंभूराजे, विचारवंत गोविंदराव पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’, विचारवंत पुरुषोत्तम खेडेकर लिखित लोकमाता अहिल्यादेवी ही प्रबोधनपर पुस्तके महिलांना वाण म्हणून भेट देण्यात आली. तुळजाभवानी संस्थेच्या मुख्यालयासमोर हा अभिनव कार्यक्रम २७ जानेवारी रोजी घेण्यात आला. आभार सौ.स्मिता शहाजी शेजुळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शारदा अशोक शेजुळ, सौ.अनुराधा भास्कर गवळी, सौ.सुप्रिया सुमित शेंडगे, सौ.द्वारका अशोक मगर, सौ.अमृता शिवराज घुसे, सौ.प्रियंका संतोष मोरे, सौ.अर्चना नवनाथ शिंगणे आदींनी परिश्रम घेतले.

तुळजाभवानीचे महिला सबलीकरण प्रेरणादायी : सौ.मंगलाताई सोळंके

माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा माजी बीड जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलाताई सोळंके यांनी तुळजाभवानी अर्बनच्या अभिनव सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. प्रबळ महिला, सशक्त महिला हे ब्रीद घेऊन हळदी-कुंकू कार्यक्रमातून लोकप्रबोधन करण्याचे कार्य केले ते अतिशय प्रेरणादायी आहे. महिला सबलीकरणाबाबत जनजागृती करणारे फलक लक्ष वेधून घेत होते.

Comment here