आपला जिल्हा

आरोग्यसेवा कशी करावी, याचे उत्तम उदाहरण बाजीराव चव्हाण

उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडून प्रशंसा; बीड येथील शिवसेना वैद्यकीय मदत केंद्रास भेट

बीड : महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा कशी करावी, याचे उत्त्तम उदाहरण म्हणजे आरोग्य सेवक बाजीराव चव्हाण होय, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी प्रशंसा केली.

बीड येथील शिवसेना वैद्यकीय मदत केंद्रास २ फेब्रुवारी रोजी मंत्री महोदय यांनी सदिच्छा भेट दिली. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक आरोग्य सेवक बाजीराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात सर्व टीमशी संवाद साधला. पुढे बोलताना मंत्री उदयजी सामंत म्हणाले, राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाजीराव चव्हाण हे सामाजिक काम करत असताना वैद्यकीय सेवा कशी करावी, वैद्यकीय धोरण कसे राबवावे, याचे नितांत उत्त्तम उदाहरण म्हणजे आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण हे होय. बाजीराव चव्हाण यांचे संपूर्ण राज्यभर काम आहे. त्यांच्या कामाला तोड नाही, अशा शब्दांत मंत्री महोदय यांनी चव्हाण यांच्यासह त्यांच्या टीमची प्रशंसा केली.

मंत्री उदयजी सामंत यांचे धर्मवीर प्रतिष्ठानकडून जंगी स्वागत

धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून बीड शहरात राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, लोकसभा संपर्कप्रमुख विजय पाटील, बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर, डाॅ.ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.

आता बाजीराव चव्हाण यांनी नवी जबाबदारी घ्यावी : मंत्री सामंत यांची सूचना 

मंत्री उदयजी सामंत यांनी बाजीराव चव्हाण यांचे आरोग्य सेवेतील काम पाहता आता त्यांनी नवी जबाबदारी घ्यावी,अशी सूचना मंत्री महोदय यांनी केली. राज्यभर युवा सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आरोग्य सेवेच्या ज्या योजना आहेत, त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, जेणे करून सरकारच्या आरोग्यसेवेचा समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळेल.

Comment here