आपला जिल्हा

उद्या महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार उद्घाटन; भरगच्च कार्यक्रमाची बीडकरांना ठरणार पर्वणी

बीड : महासंस्कृती महोत्सवाचा शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी शुभारंभ होणार आहे. राज्याची कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. येथील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी शालेय विद्यार्थी, बचत गटाच्या महिलांची शोभायात्रा निघणार आहे. शनिवारी ५:३० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून यानंतर लोककलांचे सादरीकरण यानंतर जादू हिंदुस्तानी ग्रुप यांचा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवांसोबतच कृषी महोत्सव विभागीय सरस महोत्सव आणि नवतेजस्विनी महोत्सव असे एकाच छताखाली होणार असून या ठिकाणी कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन परिसंवाद चर्चा आधुनिक कृषी अवजार प्रदर्शन असे शेतकऱ्यांशी निगडित कार्यक्रम आहेत.

मराठवाडा विभागीय सरसच्या विक्री प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शंभरहून अधिक बचत गट समूहातील महिला उद्योजक त्यांनी तयार केलेले तसेच उत्पादित केलेले विविध खाद्य वस्तू तसेच हस्तकला विक्री प्रदर्शन असणार आहे. नवतेजस्विनीच्या अंतर्गत खाद्यपदार्थांची विक्री होणार आहे या अंतर्गत सकस आहार रेसिपी तिरंगा थाळी चा आस्वाद बीडकर घेतली. हा महोत्सव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ग्राम विकास विभाग कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित केला जात असून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महोत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन मनोरंजनात्मक तसेच प्रबोधनात्मक होणाऱ्या या महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comment here