माजलगाव : तालुक्यातील सर्व बाजार घटकांसाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनीयमन)अधिनियम 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुधारणा प्रस्तावित केलेले आहे या प्रस्तावित विधेयकातील सुधारणा या शेतकरी व सर्व बाजार घटकांना तसेच बाजार समितीचे अस्तित्व व लोकशाही मूल्यांचे महत्त्व संपुष्टात आणणारे आहे यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे यांनी या विधेयकाला विरोध म्हणून 26 फेब्रुवारी सोमवार रोजी राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकरी व सर्व बाजार घटकांनी 26 फेब्रुवारी सोमवारी आपला शेतीमाल विक्रीस आणू नये कारण बाजार समितीचे व्यवहार बंद राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाऊ सवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
Comment here