विशेष वार्ता

चंद्रकांत शेजुळ एक अष्टपैलू व्यक्तीमत्व

भगीरथ तोडकरी

Mमाजलगाव : सामाजिक, राजकीय आणि सहकार अशा विविध क्षेत्रात आजमितीला चंद्रकांत शेजुळ हे अग्रेसर नाव आहे. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात करण्यात चंद्रकांत शेजुळ यांची अपार मेहनत आहे. गोरगरीब, दुःखितांच्या हाकेला धावून जाणारे चंद्रकांत शेजुळ हे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून नावारूपास येत आहे. 3 फेब्रुवारी हा शेजुळ यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाशझोत.





माजलगावस्थित तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचा वैभवशाली डोलारा फुलविण्यात चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांचा हातखंडा राहिला आहे. तुळजाभवानी अर्बन म्हणजे चंद्रकांत शेजुळ असे जणू समीकरण झाले आहे. सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करून राजकीय पटलावरही चंद्रकांत शेजुळ सक्रीय झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही त्यांनी अल्पावधीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेतही त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. प्रतिष्ठेच्या पात्रुड जिल्हा परिषद सर्कलमधून तत्कालीन आमदार आर.टी.देशमुख यांचे चिरंजीव रोहित देशमुख यांचा पराभव करून शेजुळ जिल्हा परिषदेची पायरी चढले. आज त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद आहे. कोणत्याही पदाला न्याय दिला पाहिजे, या हेतूने चंद्रकांत शेजुळ कार्यरत असतात.




सहकार, राजकीय क्षेत्राबरोबरच उद्योग, शेतीमध्येही त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून आपले अष्टपैलू व्यक्तीमत्व सिध्द केले आहे. तुळजाभवानी अर्बन आज राज्यातील काही काही बोटावर मोजण्याइतपत मल्टीस्टेटमध्ये अव्वल आहे. तुळजाभवानीने राबवलेले उपक्रम जनसामान्यांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. अंडरग्राऊंड लाॅकर सिस्टीम कार्यान्वीत करणारी तुळजाभवानी अर्बन राज्यातील पहिली मल्टीस्टेट ठरली आहे. या नव्या अफलातून प्रयोगाचे चंद्रकांत शेजुळ हे जनक ठरले आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांच्या मदतीला चंद्रकांत शेजुळ धावून गेलेले आहेत. माजलगाव तहसिल कार्यालयास वाॅटर फिल्टर, सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव मदत, कोरोना मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला तब्बल 11 लाख रुपयांचा निधी, लाॅकडाऊन काळात पोलिस कर्मचाऱ्यांना अन्नदान, असे एक नव्हे अनेक उपक्रम राबविण्यात चंद्रकांत शेजुळ यांची सामाजिक बांधिलकी असते. प्रत्येक घटकांसाठी आपण काहीतरी देणे लागतो, याच भावनेतून चंद्रकांत शेजुळ सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. नुकताच तुळजाभवानी अर्बनचा वर्धापनदिन मोफत आरोग्य व उपचार शिबिर घेवून साजरा करण्यात आला. शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना तुळजाभवानी अर्बन समुहात नोकरी देवून शेजुळ यांनी सामाजिक दायित्व स्वीकारले आहे. यासाठी त्यांचा विविध पुरस्कार देवून वेळोवेळी सन्मान झालेला आहे.

सर्वांगीण विकास करणार 

“घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलेपाशी” या ओळींप्रमाणे चंद्रकांत शेजुळ यांचे आहे. आज त्यांचा महाराष्ट्रभर नावलौकिक झाला असला तरी जन्मगाव आबेगाव बद्दल त्यांची मोठी आत्मीयता दिसते. आबेगाव शाळेसाठी भरीव निधी आणून विकास केला. यानंतरही आबेगाव बरोबरच पात्रुड सर्कलचा देखील सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही ‘वर्तमान’शी बोलताना चंद्रकांत शेजुळ यांनी दिली.

Comment here