महा-राष्ट्र

समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे शिंदे सरकार : मंत्री नारायण राणे

आरोग्य संवाद यात्रेचे कणकवलीत जंगी स्वागत 

मालवण, जि.सिंधुदूर्ग : महाराष्ट्रातील सत्तारूढ शिंदे सरकारचे आरोग्य विषयक काम आदर्शवत असून समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याला लाभले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय उद्योग मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायणजी राणे यांनी कौतुक केले.

केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायणजी राणे साहेब यांनी महाराष्ट्रव्यापी आरोग्य संवाद यात्रेचे कुडाळ-मालवण मतदारसंघात जंगी केले. दरम्यान, महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डाॅ.श्रीकांतजी शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. शिंदे सरकारच्या आरोग्य विषयक कामाचे राणे साहेबांनी कौतुक केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संपादक बाबा देशमाने, सचिव भगीरथ तोडकरी, सिंधुदूर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, आचरा तालुकाप्रमुख महेश राणे, मालवण-कुडाळ विधानसभा समन्वयक बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर यांच्याशी मंत्री राणे यांनी संवाद साधला. आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात दाखल झाली आहे. या नंतर ही आरोग्य संवाद यात्रा पुणे, मावळ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.

Comment here