महा-राष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष गरीब रूग्णांसाठी ठरतोय वरदान

मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रशंसा

जळगाव : राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आरोग्य हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत, हा कक्ष वरदान ठरत आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारचे कौतुक केले.

मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या संकल्पनेतून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत यांनी आरोग्य संवाद यात्रेच्या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी राज्य सरकारच्या आरोग्य सेवेचे कौतुक केले. गोरगरीब जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे, असे सांगितले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जळगावच्या स्थानिक पदाधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक यांची त्यांनी प्रशंसा केली.

Comment here