आपला जिल्हा

गरजवंतांचा आधार बाजीराव चव्हाण यांना ‘आरोग्यदूत’ सन्मान प्रदान

बीड : रूग्णसेवेला संपूर्णपणे झोकून दिलेले धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू बीडचे भुमिपूत्र बाजीराव चव्हाण यांना ‘आरोग्यदूत’ सन्मान प्रदान करण्यात आला.

‘लोककल्याणकारी आरोग्यदूत’ हे मासिक गेली दीड वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होत आहे. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे संपादकीय सल्लागार असलेल्या ‘आरोग्यदूत’च्या वतीने रूग्णसेवेतील भरीव योगदानाबद्दल बाजीराव चव्हाण यांना ‘आरोग्यदूत’ सन्मान आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी, धर्मवीर प्रतिष्ठानचे सचिव डाॅ.ज्ञानेश्वर जाधव यांनी जगतद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आला.

बाजीराव चव्हाण यांचे रूग्णसेवेत भरीव योगदान

समाजातील गोरगरीब आणि गरजू रूग्णांना मदत मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाजीराव चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठवाड्यातील शेकडो गरजवंतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळाल्याने मोठा आधार दिला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून ‘लोककल्याणकारी आरोग्यदूत’च्या वतीने बाजीराव चव्हाण यांना यथोचित सन्मान केला, असल्याची माहिती संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी यांनी दिली.

Comment here