आपला जिल्हा

बीड लोकसभा मतदारसंघात ६८ टक्के मतदान

परळीत सर्वाधिक ७५ टक्के मतदान

बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी ७ते सायंकाळी ६ या वाजेपर्यंत प्राथमिक उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे ६८% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या यामध्ये आष्टी ६९%, बीड ६२%, गेवराई ६५%, केज ६८%, माजलगाव ६८%, परळी ७५% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये १५ आदर्श मतदान केंद्र होते. यामध्ये २२८-गेवराई २, २२९-माजलगाव -२, २३०- बीड -२, २३१-आष्टी -५, २३२-केज -४ व २३३ परळी – १ हे होते. दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ दिव्यांग मतदान केंद्र होते, ५५ महिला मतदान केंद्र, ३१६ परदानशी केंद्र होती.

Comment here