आपला जिल्हा

वीरशैव लिंगायत समाजाच्या गुणवंतांना यंदाही मिळणार शिष्यवृत्ती

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा; श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे आवाहन

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाच्या वतीने यंदाही वीरशैव लिंगायत समाजातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचे श्री संस्थान मठातर्फे अभिनंदन करण्यात आले आणि मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी गुणवंतांना शुभाशीर्वाद दिले.

लिंगैक्य श्री गुरु तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी अनेक वर्षांपासून समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यंदाही गुरुपौर्णिमेला या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आणि आधारकार्ड दिनांक १० जुलै २०२४ पर्यंत प्रत्यक्षात सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाच्या व्यवस्थापनाकडे द्यावेत असे आवाहनही श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिवहारआप्पा महाजन (भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५८५२८९८) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन श्री संस्थान मठ माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.

‘शैक्षणिक कार्यावर अधिक भर देणार’

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरिव कार्य करत आहे. समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून सदर शिष्यवृत्ती अखंडितपणे दिली जाते. आपण समाजाचे देणेकरी लागतो, या उदात्त भावनेने सदरील शिष्यवृत्ती योजना लोकोपयोगी ठरत आहे, अशी माहिती मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली. दरम्यान, शैक्षणिक कार्यावर अधिक भर देण्यावर आपला प्रयत्न असल्याचे श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.

Comment here