महा-राष्ट्र

डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या बळाने जिगरबाज जगन जंगले घेणार पुन्हा उभारी

हायलँड हाॅस्पिटलला मंगेश चिवटेंकडून विचारपूस 

ठाणे : लोकल रेल्वेच्या प्रवासात अपघात होऊन दोन्ही पाय गमावलेल्या कल्याणच्या जगन लक्ष्मण जंगले (वय ३१ वर्षे) या तरूणाची बुधवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी भेट घेऊन हायलँड हाॅस्पिटलचे प्रशासक गोपाल सिंह, उपचार करणाऱ्या डाॅक्टरच्या टीमशी आणि जंगले कुटुंबीयांशी चर्चा केली.

जिगरबाज जगन जंगले यास डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने कृत्रिम दर्जेदार पाय डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार बसविण्यात येणार असून त्यासंदर्भात महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डाॅ.श्रीकांतजी शिंदे यांनी सूचना केल्या असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे प्रवासात चोरांपासून मोबाईल वाचवताना झालेल्या रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या ३१ वर्षीय जगन लक्ष्मण जंगले या तरूणाच्या संपूर्ण उपचाराच्या खर्चाची जबाबदारी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतली आहे. यासंदर्भात खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी सदर रूग्ण दाखल असलेल्या ठाण्यातील हायलँड हॉस्पिटलचे प्रशासक गोपाल सिंह यांच्याशी संवाद साधला आहे. सदर रूग्णाकडून हॉस्पिटलकडून अद्यापपर्यंत आकारण्यात आलेली रक्कम १.२५ लक्ष रूपये देखिल रूग्णाला परत करण्यात येत आहे. तसेच, सदर रूग्णाला भविष्यात पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम पाय देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी यांची उपस्थिती होती.

Comment here