बीड : येथील श्री.शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.उत्कर्षा जाधवने दहावी बोर्ड परीक्षेत ९९.८० टक्के गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. उत्कर्षाच्या या यशाबद्दल ‘लोककल्याणकारी आरोग्यदूत’च्या वतीने तीचा यथोचित गौरव करण्यात आला.
कु.उत्कर्षा ज्ञानेश्वर जाधवने शालांत परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण संपादन करून (९९.८०%) अक्षरशः गगनाला गवसणी घातली आहे. त्याअनुषंगाने आरोग्यदूत टीमच्या वतीने संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मातकर यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र प्रदान करून कु.उत्कर्षा जाधव आणि उत्कर्षाचे वडील डॉ.ज्ञानेश्वर जाधव, आई सौ.सुनंदा जाधव, उत्कर्षाचा छोटा बंधू चि.शार्दुल यांचा गौरव केला.
आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्याकडून अभिनंदन!
संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवक म्हणून नावलौकिक प्राप्त धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री महोदयांचे विश्वासू बाजीरावजी चव्हाण यांनीही उत्कर्षा जाधवचे अभिनंदन करून कौतुक केले. इयत्ता दहावीच्या निकालापूर्वीच लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात झालेल्या स्क्रीनिंग परीक्षेत उत्कर्षाची AIIMS (मेडिकल) बॅचसाठी निवड झाली आहे. आपल्या नेत्रदीपक अशा यशाचे गुरूजन आणि वडील डॉ.ज्ञानेश्वर जाधव, आई सुनंदा जाधव यांना श्रेय दिले आहे. गुणवंत उत्कर्षाचे धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Comment here