सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
माजलगाव : शहरीकरणाच्या ठिकाणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि विशेषतः घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालता यावा, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी या दृष्टीने माजलगाव शहरासाठी सीसीटिव्ही निगराणी या महत्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते माजलगाव शहर पोलिस स्टेशन या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांची उपस्थिती होती.
४.९४ कोटी निधी असलेल्या या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेत शाळा, महाविद्यालयासह २६ ठिकाणी ११५ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रस्त्याने ये-जा करण्याऱ्या प्रत्येक गोष्टींवर करडी नजर इथून पुढे पोलीस प्रशासनाची असेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या मध्ये केला असल्याने पोलीस यंत्रणेचा ताण कमी होणार असून शहरातील वाहतुकीला चांगली शिस्त यामुळे लागेल ही खात्री आहे. एवढच नव्हे तर लहान गुन्ह्यांचे प्रमाण हे कमी होण्यासाठी याची मदत होईल. पोलिस स्टेशन मधूनच प्रत्येक ठिकाणी सूचना देता येईल अशा प्रकारची सुविधा या मध्ये प्रामुख्याने केलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आपल्या शहरात होतोय याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली.
Comment here