महा-राष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते बाल आरोग्य अभियानाला सुरूवात 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आज शुक्रवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यव्यापी मुख्यमंत्री बाल आरोग्य अभियानाची सुरूवात करण्यात आली.

आरोग्याबाबत सजग असलेलं सरकार म्हणून शिंदे सरकारची ओळख आहे. ‘निरोगी महाराष्ट्राचा समृद्ध पाया’ हे ब्रीद घेऊन संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री बाल आरोग्य अभियानाची संकल्पना राबविली जाणार आहे. बाल आरोग्य अभियानाची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, अॅडपॅलेटचे संचालक महेश क्षीरसागर, आरोग्यदूतचे मुख्य संपादक बाबा श्रीहरी देशमाने, सहसंपादक तथा वर्तमान फाऊंडेशनचे अध्यक्ष भगीरथ तोडकरी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री बाल आरोग्य अभियानाच्या पोस्टरचे अनावरण तर जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संपूर्ण राज्यभर ५० लाख पुस्तिकांचे होणार वितरण 

मुख्यमंत्री बाल आरोग्य अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सुमारे ५० लाख विद्यार्थी-विद्यार्थीनींना या जनजागृती पुस्तिकेचे वितरण केले जाणार आहे. आरोग्यबाबत बालमनापासून व्यापक जनजागृती व्हावी, या हेतूने मुख्यमंत्री बाल आरोग्य अभियानाची संकल्पना पुढे आली असल्याची माहिती संयोजक महेश क्षीरसागर यांनी दिली.

 

Comment here