ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून संसदेत प्रशंसा; इतर राज्यांनी अनुकरण करण्याची गरज
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे काम संपूर्ण देशात आदर्शवत असेच आहे. या कार्याचे इतर राज्यांनीही अनुकरण करण्याची गरज आहे, असे कौतुक उद्गार ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज, दि.२ ऑगस्ट रोजी संसदेत केले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे काम आदर्शवत सुरू आहे. केवळ दोन वर्ष एक महिन्याच्या कालावधीत सुमारे ३६,१८२ गरीब आणि गरजू रूग्णांना ३०१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे काम आदर्शवत असेच आहे. या कार्याचे इतर राज्यांनीही अनुकरण करण्याची खरी गरज आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र सरकारची खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशंसा केली. दरम्यान, या कक्षातून ७२ तासांमध्ये निधी उपलब्ध करून जातो. या आदर्शवत कार्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत कौतुक केले.
‘३०१ कोटींचा निधी वितरीत ही ऐतिहासिक कामगिरी’
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत केवळ दोन वर्ष एक महिना या कालावधीत तब्बल ३०१ कोटींचा निधी वितरीत केला आहे, ही ऐतिहासिक बाब आहे. इतर राज्यातील सरकारनेही महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे अनुकरण करावे, असे आवाहनही खासदार नरेश म्हस्के यांनी केले.
Comment here