माजलगाव : सहकार क्षेत्रातील मानबिंदू असलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा वसा घेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात तब्बल ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला.
सहकार क्षेत्रातील अव्वल असलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांचा सोमवार, दि.३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांत शेजुळ यांचे समर्थक आणि संस्थेचे कर्मचारी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितात. यंदाही रक्तदान शिबिरातून ‘चला रक्ताचे नाते जोडूया..’ हा संदेश दिला. तब्बल ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला. या आदर्शवत कार्याचे कौतुक केले जात आहे. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटच्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज : चंद्रकांत शेजुळ
तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे ग्राहक, अधिकारी, कर्मचारी, समर्थक, आणि चाहत्यांची अक्षरशः रीघ लागली होती. यावेळी बोलताना चंद्रकांत शेजुळ म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपण समाजाचे काही तरी देणेकरी लागतो, या भावनेतून काम करणारे आम्ही आहोत. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही काळची गरज आहे.
Comment here