या ऊस गाळप हंगामाच्या सांगता समारंभास कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, ज्येष्ठ संचालक धैर्यशिल सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी व्हाईस चेअरमन जयसिंह सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी गाळप हंगामात ऊसतोड मजूर, ट्रॅक्टरचालक, मुकादम यांनी उत्कृष्टपणे काम करत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना व्हाईस चेअरमन जयसिंह सोळंके म्हणाले की, यावर्षी ऊस गाळप कमी झाले असले तरी कारखाना यंत्रणेने प्रतिदिन सहा हजार टनांपर्यंत गाळप केले आहे. हे खरोखरच कौतुकास्पद असून, याचा अभिमान आहे. आपला एकमेव कारखाना आहे. जो शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक वाढीसाठी कायम प्रयत्न करून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करत असल्याचे सांगत येणारा हंगाम मोठा कसोटीचा असून, शेतकरी बांधवांनी आपला ऊस याच कारखान्यालाच देण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्याबाहेर जाऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जयसिंह सोळंके यांनी केले. कार्यक्रमास सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, ट्रॅक्टरचालक यांच्यासह कार्यकारी संचालक रविंद्र बडगुजर सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार छगन जाधव यांनी मानले.

लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

माजलगाव : तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या ३४ व्या ऊस गाळप हंगामाची १२२ दिवसांच्या ऊस गाळप हंगामात ६.७१ लाख मेट्रीक टन उसाचे यशस्वीरीत्या गाळप करून शुक्रवारी या गाळप हंगामाची सांगता गव्हाण पूजनाने करण्यात आली.


Comment here