आपला जिल्हा

ॲड.नारायण गोले पाटील यांना समाजभूषण जाहीर

माजलगाव : तालुक्यातील सर्वपरिचित शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड.भाई नारायण गोले पाटील यांना यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला.

या पुरस्काराचे वितरण पुणे येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत कदम, प्रमुख मार्गदर्शक पोपटराव पवार, रामदास माने, संजय अडसुळे, राजेश दिवटे यांच्या उपस्थितीत पुणे येथे होणार आहे. माजलगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करत असलेल्या त्यांच्या धडपडीची, कार्याची दखल घेतली गेली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे भाई अॅड.नारायण गोले पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल प्रा.डॉ.संतोष रणखांब, अॅड.पांडुरंग गोंडे, परमेश्वर डाके, रंजित जाधव, मुंजा पांचाळ, संभाजी पाष्टे, राजाभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, विष्णू शेळके, राहुल सोळंके, राजाभाऊ आव्हाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comment here