माजलगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत विकसित करण्यासाठी नगरपालिका स्वयंपूर्ण होणे काळाची गरज आहे. मोदींचे शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजलगाव नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या. कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांना नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी, अशी साद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजलगावच्या मतदारांना घातली.
माजलगाव नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आपल्या संदेशात पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक शहर स्वयंपूर्ण व्हावे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे. त्यानुसार शहरांचा विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशातून केले. 
आठवडी बाजाराचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार; संध्या मेंडके यांची ग्वाही
माजलगावकरांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून देशात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर असल्याने नगरपालिका सुध्दा भाजपकडे द्या, जेणेकरून विकास गतीमान करता येईल. माजलगाव शहरातील सर्व मुलभूत प्रश्न सोडविताना आठवडी बाजाराचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याची ग्वाही माजलगाव नगरपरिषद भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांनी दिली.



Comment here