आपला जिल्हा

तुळजाभवानी अर्बनकडून मानवतेचा आदर्श

अपघाती मृत्यू झालेल्या खातेदाराचे २.१५ लाखांचे गोल्ड लोन विम्यातून मंजूर

माजलगाव : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.माजलगावच्या तीर्थपुरी शाखेतील सोनेतारण कर्ज खातेदार गणेश सूर्यभान नरवडे यांचे अपघाती अकाली निधन झाल्यानंतर संस्थेने मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.

गणेश सूर्यभान नरवडे यांनी घेतलेल्या सोनेतारण कर्जावर असलेला विमा लागू करून संस्थेने २ लाख १५ हजार रूपयांची विमा रक्कम मंजूर करून घेतली. ही रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करून सोनेतारण कर्ज खाते पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यानंतर गहाण ठेवलेले दागिने त्यांच्या वारसदार किशोर गणेश नरवडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी तुळजाभवानी अर्बनचे विभागीय अधिकारी सिद्धेश्वर शिंगणे, तीर्थपुरी शाखेचे व्यवस्थापक प्रकाश फपाळ उपस्थित होते. या निर्णयामुळे कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी झाला असून संस्थेच्या या संवेदनशील भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे.

Comment here