उपाध्यक्षपदासाठी अॅड. राहुल बजाज यांनी १०४ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात ॲड.बी.एस. घोडे यांना ८० मते मिळाली. बजाज यांनी २४ मतांनी विजय मिळवला. सचिवपदासाठी अॅड.नारायण तेलगड यांनी ११८ मते मिळवून विजय मिळवला, तर प्रतिस्पर्धी बी.एस.घनघाव यांना ६६ मते मिळाली. तेलगड यांनी ५२ मतांच्या फरकाने बाजी मारली. तर कोषाध्यक्षपदी इनामदार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.एस.आर.आचार्य यांनी काम पाहिले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.एस.डब्ल्यू.साळवे व अॅड.शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली. विजयी उमेदवारांचे अॅड.विठ्ठलराव तिडके, ॲड.मच्छिंद्र डोंगरदिवे, ॲड.भानुदास डक, अॅड.सचिन सुतळे, ॲड.अखिलेश घाडगे, अॅड.विजय कुरे, ॲड.इंद्रजीत शिंदे, अॅड.विठ्ठल फपाळ, अॅड.रामेश्वर शेजुळ, अॅड.श्यामसुंदर गोंडे, अॅड.प्रल्हाद तौर व अॅड.विशाल थावरे यांनी अभिनंदन केले.
माजलगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.नारायण गोले पाटील

माजलगाव : माजलगाव वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत अॅड.नारायण गोले पाटील विजयी झाले. २०२६-२०२७ या कार्यकारिणीच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी उत्साहात व शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत विविध पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. अध्यक्षपदासाठी ॲड.नारायण गोले यांनी दणदणीत विजय मिळवत १२७ मते प्राप्त केली, तर प्रतिस्पर्धी ॲड.आरती गाडेकर यांना ५५ मते मिळाली. त्यामुळे गोले यांनी ७२ मतांच्या फरकाने विजय मिळवला.


Comment here