आपला जिल्हा

नवरात्रोत्सवात माजलगावात रंगणार दांडियाचा जल्लोष

युवासेनेतर्फे झेंडा चौकात दांडिया महोत्सवाचे आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

माजलगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरातील झेंडा चौक, जुना चौक रोड येथे युवासेनेच्या वतीने भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दांडियाचा रंगतदार कार्यक्रम होणार असून, महिला, युवक-युवतींसह शहरातील नागरिकांना उत्सवाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

नवरात्र हा भक्ती, शक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव मानला जातो. याच उत्सवाला मनोरंजनाची आणि सामाजिक एकोप्याची जोड देण्यासाठी युवा सेनेच्या वतीने दरवर्षी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले जाते. पारंपरिक दांडियाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणत सामाजिक बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

झेंडा चौक, जुना चौक रोड येथे होणाऱ्या या महोत्सवात नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी दांडियाचा उत्साह अनुभवता येणार आहे. विशेषतः महिला व युवक-युवतींसाठी हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या दांडिया महोत्सवाचे आयोजन युवा सेना तालुकाप्रमुख अभिजीत कोंबडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दांडिया महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक अभिजीत आबा कोंबडे यांनी केले आहे.

स्थळ : झेंडा चौक, जुना चौक रोड, माजलगाव

वेळ : सायंकाळी ६.३० ते रात्री १०.३०

आयोजक : अभिजीत अबा कोंबडे, युवासेना तालुकाप्रमुख, माजलगाव

Comment here